Monday, October 21, 2024

त्वचेसाठी आरोग्यदायी टिप्स | Healthy Skin Tips In Marathi

 त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. आपल्या शरीराचे संरक्षण करण्याचे महत्वाचे काम त्वचा करते. त्वचा निरोगी असताना आपले विविध आजारांपासून संरक्षण करण्यासाठी कठोर परिश्रम करते. पण जेव्हा त्वचेच्या आरोग्याशी तडजोड केली जाते तेव्हा शरीराचे संरक्षण करण्याची त्वचेची क्षमता बिघडते. त्यामुळे त्वचेची नियमितपणे काळजी (Healthy Skin Tips In Marathi)  घेणे महत्वाचे आहे. रोज काही गोष्टींचे नियमतपणे पालन केल्यास त्वचेचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी पुढील टिप्सचे (Skin Care Tips In Marathi) पालन करा आणि सुंदर व निरोगी त्वचा मिळवा आणि जाणून घ्या उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल.

त्वचेसाठी आरोग्यदायी टिप्स | Healthy Skin Tips In Marathi
त्वचेसाठी आरोग्यदायी टिप्स
  1. त्वचेचे उन्हापासून संरक्षण करा. त्वचेची काळजी घेण्याची सर्वात महत्वही पायरी म्हणजे सूर्यापासून संरक्षण करणे होय. सूर्यप्रकाशामुळे सुरकुत्या, त्वचेवर डाग पडणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात व त्वचेच्या कर्करोगाचा धोका देखील वाढतो.
  2. म्हणूनच उन्हात जाताना कमीतकमी 15 च्या SPF सह ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा. ​​ढगाळ वातावरण असले तरीही सनस्क्रीन लावा, 
  3. सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या दरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा. कारण या काळात सूर्याची किरणे सर्वात तीव्र असतात.
  4. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी लांब बाह्यांचे शर्ट व फुलपँट घाला. शक्य असेल तर मोठ्या हॅटने तुमची त्वचा झाकून टाका
  5.  धूम्रपान टाळा.  धूम्रपानामुळे तुमची त्वचा अकाली वृद्ध दिसू लागते आणि सुरकुत्या पडतात. धुम्रपान त्वचेच्या बाहेरील थरांमधील लहान रक्तवाहिन्या अरुंद करते, ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो आणि त्वचा निस्तेज होते. 
  6. धुम्रपान केल्याने त्वचेमधील कोलेजन आणि इलास्टिनचे देखील मोठे नुकसान होते व त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. 
  7.  आंघोळीसाठी खूप गरम पाणी घेऊ नका आणि दीर्घ काळ उष्ण पाण्याच्या संपर्कात राहू नका. यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते व त्वचा कोरडी पडते. आंघोळीसाठी शक्यतोवर कोमट पाणी वापरा.
  8. हार्श साबण वापरू नका. साबण आणि डिटर्जंट तुमच्या त्वचेतून आर्द्रता काढून टाकू शकतात. त्याऐवजी, सौम्य प्रकारचा साबण वापरा.
  9. आपल्या त्वचेचे संरक्षण  करण्यापूर्वी शेव्हिंग करताना शेव्हिंग क्रीम, लोशन किंवा जेल लावा. तसेच त्वचेला इजा होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेला स्वच्छ व धारदार रेझर वापरा. केस ज्या दिशेने वाढतात त्याच दिशेने शेविंग करा. 
  10. आंघोळ केल्यावर किंवा चेहेरा धुतल्यानंतर त्वचा खसाखसा न पुसता टॉवेलने हलक्या हाताने पाणी पुसून टाका जेणेकरून तुमच्या त्वचेवर थोडा ओलावा शिल्लक राहील.
  11. कोरड्या त्वचेला मॉइश्चरायझ करा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुमच्या त्वचेला अनुकूल असे मॉइश्चरायझर वापरा.
  12. सकस आहार घ्या. आपल्या शारीरिक आरोग्याप्रमाणेच त्वचेच्या आरोग्यासाठीही निरोगी आहार घेणे आवश्यक आहेत. भरपूर ताजी फळे, भाज्या, प्रक्रिया न केलेले धान्य आणि प्रथिने यांचा आहारात नियमितपणे समावेश करा.
  13. योग्य प्रमाणात पाणी प्या. भरपूर पाणी प्यायल्याने तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. 
  14. ताणतणावाचे व्यवस्थापन करा. तणावाचा आपल्या त्वचेवरही परिणाम होऊ शकतो. व त्वचा अधिक संवेदनशील बनवू शकतो. त्यामुळे मुरुमांचा त्रास आणि इतर त्वचेच्या समस्या होऊ शकतात. म्हणूनच तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरेशी झोप घ्या, संतुलित आहार घ्या. योग्य व नियमित व्यायाम करा आणि तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी करण्यासाठी वेळ काढा.

हे उपाय केलेत तर तुम्हाला सुंदर व निरोगी त्वचेचे वरदान मिळेल. 

No comments:

Post a Comment

मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी?

                                                         मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी? मानेचा त्रास तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकत नाह...