Monday, October 21, 2024

सुंदर आणि निरोगी केसांसाठी आरोग्यदायी टिप्स | Healthy Hair Tips In Marathi

 

आपले केस कसे आहेत यात आनुवंशिकता महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु आपला आहार, जीवनशैली व वातावरण यांचाही आपल्या केसांवर मोठा परिणाम होतो. केसांची काळजी घेण्याचा तुमचा एकूण दृष्टीकोन कसा आहे यावरही तुमच्या केसांचे आरोग्य ठरते. आपल्या डोक्याच्या संरक्षणासाठी असलेले आपले केस सुंदर, लांब व दाट (Hair Growth Tips In Marathi) असावेत असे प्रत्येकालाच वाटते. पण त्यासाठी केसांची काळजी (Hair Care Tips In Marathiअगदी निगुतीने घ्यावी लागते. केस गळतीवर घरगुती उपाय करता येतात. केसांचे आरोग्य राखण्यासाठी व त्यांची काळीज घेण्यासाठी (Tips For Healthy Hair In Marathi) पुढील टिप्स वाचा. 


सुंदर आणि निरोगी केसांसाठी आरोग्यदायी टिप्स | Healthy Hair Tips In Marathi
सुंदर आणि निरोगी केसांसाठी आरोग्यदायी टिप्स
  1.  केसांच्या आरोग्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत. केस आणि टाळूच्या आरोग्यासाठी योग्य आहार हा एक महत्त्वाचा घटक आहे. केस प्रामुख्याने प्रथिनांपासून बनलेले असतात, म्हणून दररोज आहारात किमान 45 ग्रॅम प्रथिने घ्या. 
  2. प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस कमकुवत व ठिसूळ केस होतात. तसेच ते निस्तेज होतात व गळतात. 
  3. झिंकच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. यासाठी आहारात नट्स, अक्रोड, पेकान, काजू आणि बदाम यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.
  4. तसेच आहारात भरपूर प्रमाणात भाज्या, फळे, हिरव्या पालेभाज्या, सॅलड्स घ्या. व भरपूर प्रमाणात पाणी प्या. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या. 
  5. ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे सेवन वाढवल्याने केसांची मुळे आणि सेबेशियस ग्रंथी उत्तेजित होऊ शकतात. यामुळे टाळूचे आरोग्य सुधारते
  6. तुम्ही आठवड्यातून किती वेळा केसांना शॅम्पू लावता यावर देखील केसांचे आरोग्य अवलंबून असते. तुमचे केस तेलकट असतील तर तुम्हाला जास्त वेळेला केस धुण्याची गरज असते. आपल्या केसांची गरज ओळखून त्यानुसार केस धुण्याचे वेळापत्रक ठरवा व शक्यतोवर ऑरगॅनिक उत्पादनांचा वापर करा.
  7. केसांसाठी योग्य शॅम्पू निवडा. चुकीचे शॅम्पू आणि स्टाइलिंग एजंट वापरल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. तुमच्या केसांच्या प्रकारासाठी योग्य असलेली उत्पादने निवडा.  अमोनियम लॉरील सल्फेट किंवा सोडियम लॉरील सल्फेट सारखे कठोर घटक असलेले शॅम्पू शक्यतोवर टाळा.
  8. केस धुतल्यावर त्यांचे कंडिशनिंग करणे ही केस मऊ, चमकदार ठेवण्यासाठी एक महत्त्वाची पायरी आहे. तुमच्या केसांसाठी कोणते कंडिशनर योग्य आहे हे शोधून काढा व ते वापरा. 
  9. दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा केस धुवू नका. केस धुताना खूप गरम किंवा खूप थंड पाणी वापरणे टाळा.
  10. केस ओले असताना हळूवारपणे हाताळा कारण ते ओले असताना तुटण्याची शक्यता जास्त आहे. ओले केस टॉवेलने जास्त खसाखसा पुसू नका. विलग करण्यासाठी जाड व रुंद दात असलेला कंगवा वापरा, परंतु ओले केस जास्त ब्रश करू नका.
  11. केस ब्लो ड्राय करताना सर्वात कमी सेटिंगपासून प्रारंभ करा आणि आवश्यकतेनुसार हळूहळू उष्णता वाढवा. जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमचे केस नैसर्गिकरित्या हवेत कोरडे होऊ द्या.
  12. केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि रक्ताभिसरण वाढविण्यासाठी आपल्या टाळूला नियमितपणे मालिश करा.
  13. केस निरोगी ठेवण्यासाठी आणि तुटणे टाळण्यासाठी – प्रत्येक 10 ते 12 आठवड्यांनी – नियमितपणे केसांना खालून कट द्या

No comments:

Post a Comment

मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी?

                                                         मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी? मानेचा त्रास तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकत नाह...