Sunday, November 3, 2024

आंबट ढेकर, गॅस, छातीत जळजळीने वैतागलाय? पोटात वाढलंय भयंकर पित्त, हे 3 आयुर्वेदिक उपाय देतील एका मिनिटात मुक्ती

 

आंबट ढेकर, गॅस, छातीत जळजळीने वैतागलाय? पोटात वाढलंय भयंकर पित्त, हे 3 आयुर्वेदिक उपाय देतील एका मिनिटात मुक्ती

शरीरातील पित्ताचे असंतुलन वाढल्यामुळे पोटाशी संबंधित आजार होतात. शरीरात पित्ताचे प्रमाण वाढल्याने शरीरात उष्णता वाढणे, ऍसिड रिफ्लक्स, गॅस, अपचन, सांधे सुजणे, मळमळ, जुलाब किंवा बद्धकोष्ठता, राग आणि चिडचिड, तोंडाची दुर्गंधी यासारखी लक्षणे दिसू शकतात.

महाराष्ट्र टाइम्स.कॉमआंबट ढेकर, गॅस, छातीत जळजळीने वैतागलाय? पोटात वाढलंय भयंकर पित्त, हे 3 आयुर्वेदिक उपाय देतील एका मिनिटात मुक्ती
आंबट ढेकर, गॅस, छातीत जळजळीने वैतागलाय? पोटात वाढलंय भयंकर पित्त, हे 3 आयुर्वेदिक उपाय देतील एका मिनिटात मुक्ती
पचनक्रियेवेळी भोजन पचण्यासाठी पित्ताची (bile acid) गरज असते. याला सामान्य भाषेत आम्ल, विष व गॅस्ट्रिक अॅसिड (gastric acid) किंवा वैद्यकीय भाषेत याला डायजेस्टिव (digestive) असे सुद्धा म्हणतात. उत्तम पचनासाठी पित्ताची लेव्हल योग्य असणे गरजेचे असते. पण जर पित्त वाढले तर मात्र तुम्हाला मोठा त्रास होऊ शकतो. पण हे पित्त आहे तरी काय आणि याचे काम काय असते? तर मंडळी पित्त हे लिव्हर मध्ये तयार होते आणि पित्ताशयाच्या पिशवीमध्ये जमा होते. येथून अन्नाच्या पचनासाठी छोट्या आतड्यांमध्ये ते सोडले जाते. आयुर्वेदामध्ये पित्त पचनशक्ती किंवा अग्नी या नावाने ओळखले जाते.

याचे संतुलन बिघडले तर पोटाचे विकार आणि समस्या उद्भवू लागतात. म्हणून तुम्ही तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. पित्त वाढण्याची लक्षणे काय आहेत? आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्या मते शरीरात पित्ताचे प्रमाण वाढल्याने शरीरात उष्णता वाढणे, ऍसिड रिफ्लक्स, गॅस, अपचन, सांध्यांना सूज येणे, मळमळ, जुलाब किंवा बद्धकोष्ठता, राग आणि चिडचिड, श्वासाची दुर्गंधी यांसारखी लक्षणे दिसतात. . पित्त कमी करण्याच्या उपायाबद्दल सांगायचे तर रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही गोष्टींच्या मदतीने आराम मिळवू शकतात.

पित्ताची लक्षणे

शरीरामध्ये पित्ताचे उत्पादन जास्त होणे म्हणजेच अॅसिडिटी होणे याची काही खास लक्षणे आहेत. या लक्षणांमध्ये छातीत आणि हृदयात जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, मळमळणे. गळ्यात जळजळ होणे, उलटी होणे, पोटात गॅस तयार होणे, पोट जड वाटणे, पोटात दुखणे, छातीत दुखणे, श्वासाची दुर्गंधी, पायांमध्ये आणि हातात जळजळ, तोंडात अल्सर होणे, थकवा, चक्कर येणे आणि पूर्ण शरीरात खाज येणे यांचा समावेश आहे

पित्त निर्माण होण्याची कारणे

पित्त म्हणजे काय हे तर आपण जाणून घेतले. त्याची लक्षणे देखील आपल्याला समजली. पण पित्त निर्माण कशामुळे होते? याची कारणे आहे ते सुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही जर मसालेदर पदार्थ किंवा तळलेले पदार्थ खूप खात असाल, फास्ट फूडचे सेवन मोठ्या प्रमाणावर करत असाल आणि पाणी खूप कमी पीत असाल तर तुम्हाला पित्त होऊ शकते. तर या पित्तावर काही खास घरगुती उपाय आज आम्ही तुम्हाला या लेखामधून सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया

काळ्या मनुक्यांचे पाणी

पित्त कमी करण्यासाठी तुम्ही काळ्या मनुक्यांचे पाणी प्यायला हवे. यात नैसर्गिक अँटी-ऑक्सिडेंट्स असतात आणि मुख्य म्हणजे हे थंड असते. हे पाणी प्यायल्याने तुम्हाला ब्लीडिंग, हेअर फॉल, एनिमिया यांपासून सुद्धा आराम मिळतो. मासिक पाळीवेळी होणाऱ्या वेदना आणि बद्धकोष्ठता यावर सुद्धा हे पाणी अगदी रामबाण आहे. त्यामुळे अवश्य हा उपाय ट्राय करून पहा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल.

काळ्या मनुक्यांचे पाणी कसे बनवावे?

मूठभर काळे मनुके घेऊन ते नीट धुवा आणि एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यात भिजवलेले मनुके बारीक करून घ्या आणि स्वादिष्ट आणि थंडगार मनुक्याचं पाणी प्या. तुम्ही ते सकाळी किंवा जेवणाच्या एक तास आधी किंवा नंतर घेऊ शकता.

तांदळाचे पाणी

जर तुमच्या शरीरात खूप उष्णता असेल तर तुम्ही तांदळाचे वा भाताचे पाणी प्य्याला हवे. यामुळे शरीरात थंडावा वाढतो. जर तुम्हाला पित्ताची लक्षणे दिसत असतील आणि तुमच्या शरीरात खूप जास्त उष्णता झाल्याचे तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही नियमितपणे तांदळाचे पाणी प्यायला हवे. हे तांदळाचे पाणी म्हणजेच पेज होय. कोकणामध्ये उष्णतेच्या कारणामुळेच पेज पिण्याची परंपरा आहे.

बडीशेपचे पाणी

तुम्हाला अॅसिडिटीपासून सुटका हवी असेल तर एक कप पाण्यात काही बडीशेप घेऊन ती उकळवा आणि त्याचा काढा प्या. बडीशेपमध्ये तेल असते जे पचनाला मदत करते आणि सूज कमी करते. शिवाय पोटाच्या समस्येवर सुद्धा हे पाणी खूप रामबाण समजले जाते. जर तुम्हाला अॅसिडिटीवेळी छातीत जळजळ होत असेल तर तुम्ही बडीशेपचे पाणी तयार करून प्या. तुम्हाला फरक नक्की दिसेल

बडीशेपचं पाणी कसं बनवायचं

एक चमचा बडीशेप पावडर घ्या आणि एका ग्लास थंड पाण्यात एक चमचा सैंधव साखर मिसळा आणि हे गोड पेय प्या. दुपारच्या जेवणानंतर 2 तासांपर्यंत तुम्ही ते पिऊ शकता.

No comments:

Post a Comment

मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी?

                                                         मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी? मानेचा त्रास तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकत नाह...