Sunday, October 20, 2024

जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणारे आजार

 

  • “अ” जीवनसत्त्व: “अ” जीवनसत्त्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा येतो.

उपाय :यासाठी बाळ ५ वर्षाचे होईपर्यंत “अ” जीवनसत्त्वाचा डोस” दर ६ महिन्यांनी दिला जावा. दैनंदिन आहार्त हिरव्या पालेभाज्या विशेषतः शेवग्याचा पाला, पालक मेथी, इत्यादी पाले भाज्यांचा समावेश असावा. तसेच रंगीत फळे उदा. गाजर, tomato, पापी, आंबा भोपळा यांचा समावेश आहारात असावा. मांस , अंडी, प्राण्यांचे यकृत यात “अ” जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असते.

  • “ड” जीवनसत्त्व : “ड” जीवनसत्त्वाच्या अभावामुळे हाडे ठिसूळ होतात. मुडदूस हा आजार होतो. यात बाळाचे कपाळ मोठे होते, घाम जास्त येतो, बाळाची शारीरक वाढ होत नाही, सांधे सुजल्यासारखे दिसतात, बाळ वर्षाचे होऊन गेले तरी उभे राहू शकत नाही , त्याचे चालण्याचे वय लांबते, छातीच्या फासळ्या व पायांना बाक येतो, पोट मोठे दिसते.

उपायः दुध, माशाचे तेल, अंडी, मांस, इत्यादी आहार सुरू करणे, सकाळच्या कोवळ्या उन्हात बाळाला ठेवणे. आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने “ड” जीवनसत्त्वाची पुडी दुधातून द्यावी. व “ड” जीवनसत्त्वाचा डोसा ६ महिन्यातून एकदा द्यावा

  • “ब” जीवनसत्त्व”: “ब” जीवनसत्त्वाचा अभावामुळे सतत तोंड येते, गालावर चट्टे येतात, ओठांच्या कदा चिरतात.

उपायः हिरव्या भाज्या, मोड आलेली कडधान्ये (मुग, वाटाणे, मटकी, हरभरे), दुध यांचा आहारात समावेश करावा. तांदूळ गहू यांच्या बाहेरील आवरणात “ब” जीवनसत्त्व असते. कोंडा काढून टाकला तर “ब” जीवनसत्त्व निघून जाते, तांदूळ खूप धुऊन घेतले तर तांदळातले “ब” जीवनसत्त्व निघून जाते. “ब” जीवनसत्त्वयुक्त आहार घ्यावा . आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या किंवा औषध घ्यावे.

  • “क” जीवनसत्त्व :

लक्षणे व रोगनिदान : सुरुवातीला रोगप्रतिकारक शक्ती कमी पडते, रक्तपांढरीची लक्षणे दिसू लागतात. रक्तवाढीसाठी लोह, “ब” जीवनसत्त्व, “क” जीवनसत्त्व आणि प्रथिने यांची गरज असते. “क” जीवनसत्त्वाचा अभाव जास्त झाल्यास हाडांना सूज येते व ही हाडे दुखू लागतात. त्यामुळे बाळाला हात लावला तरी बाळ रडते, आईने उचलून घेण्याचा प्रयत्न केला तरी बाल रडते. छातीच्या फासळ्या दुखतात, सांधे दुखतात, हिरड्या सुजतात व त्यातून रक्त येते.

No comments:

Post a Comment

मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी?

                                                         मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी? मानेचा त्रास तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकत नाह...