. | |
| विविध साथीचे रोगांचे उद्रेक व त्या आटोक्यात आणणेच्या दृष्टीने डॉ. टापरे यांचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास नेहमी सहकार्य असते. या लेखा मध्ये डॉ. टापरे यांनी स्वाईन फ्लू या आजाराविषयी सर्वसामान्य जनतेला नेहमी पडणाऱ्या प्रश्नांचा उहापोह केला आहे. | |
| | |
| 1) स्वाईन फ्लू हा आजार काय आहे.? | |
| 2) स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, हयूमन फ्लू (HlNl) हे सर्व एकच आजार आहेत काय. ? | |
| 3) सध्या अस्त्वित्वात असलेला स्वाईन फ्लू (HlNl) हा नवीन आजार आहे काय. ? | |
| 4) स्वाईन फ्लू (HlNl) या आजाराचा प्रसार कसा होतो. ? | |
| 5) डूकराचे मांस खाल्यास (HlNl) फ्लू चा संसर्ग होवू शकतो का? | |
| 6) (HlNl) फ्लू चा आजार फक्त शहरी भागातच होते हे खरे आहे काय. ? | |
| 7) (HlNl) फ्लू या आजाराची लक्षणे कोणती. ? | |
| 8) (HlNl) फ्लू चा आजार कोणाला होवू शकतो. ? | |
| 9) तीव्र गंभीर स्वरुपाचा आजार कोणामध्ये दिसून येतो. . ? | |
| 10) रुग्णांपासून किती दिवसांपर्यंत (HlNl) विषाणूंचा प्रसार होवू शकतो.? | |
| 11) (HlNl) फ्लू च्या गंभीर स्वरुपातील आजाराची लक्षणे कोणती. ? | |
| 12) आजाराची लक्षणे दिसू लागल्यावर रुग्णाने कोणती काळजी घ्यावी.? | |
| 13) (HlNl) फ्लू च्या आजाराचे अचूक निदान कसे ठरविले जाते. ? | |
| 14) (HlNl) फ्लू च्या आजारावर उपचार होवू शकतो काय.? | |
| 15) आजार होवू नये म्हणून बाजारात काही इतर औषधोपचार उपलब्ध असल्याचा दावा | |
| 16) (HlNl) फ्लू चा आजार टाळण्यासाठी उपचार उपलब्ध आहेत काय.? | |
| | |
| 1) स्वाईन फ्लू हा आजार काय आहे.? स्वाईन फ्लू हा इन्प्ल्यूएन्झा ए या विषांणूपासून होणारा आजार असून याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने डूकरांमध्ये होतो. तथापि या आजाराने डूकरे मरण्याची संभावना अत्यल्प आहे. क्वचित प्रसंगी याचा संसर्ग डुकरांच्या निकट संपर्कात राहणऱ्या व्यक्तींना होऊ शकतो. | |
| | |
| 2) स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, हयूमन फ्लू (HlNl) हे सर्व एकच आजार आहेत काय. ? फ्लू होण्यास जबाबदार असलेला इन्पल्यूएन्झा ए विषाणू सतत आपले अंतर्गत स्वरुप बदलत असतो. त्यामुळे या विषाणूचे बरेच प्रकार अस्तित्वात आहेत. ठराविक प्रकारचे विषाणू विशिष्ठ प्रकारचे प्राणी / पक्षांच्या प्रजातीमध्ये प्रामुख्याने आढळतात. उदा. डूकरांमध्ये होणारा स्वाईन फ्लू पक्षांमध्ये होणारा बर्ड फ्लू व माणसांना होणारा हयूमन फ्लू शक्यतो हे सर्व विषाणू आपापल्या विशिष्ठ प्रजातीशीच निगडीत असतात. तथापि क्वचित प्रसंगी हे विषाणू इतर प्राणी / पक्षी प्रजातीमध्ये शिरकाव करु शकतात. | |
| | |
| 3) सध्या अस्त्विात असलेला स्वाईन फ्लू (HlNl) हा नवीन आजार आहे काय. ? सध्या अस्तिवात असलेला (HlNlफ्लू हा एक नवीन संक्रमित विषाणूजन्य फ्लूचा आजार आहे. स्वाईन फ्लू , बर्ड फ्लू व हयूमन फ्लू चे तीन विषाणू डूकराच्या शरीरात एकत्र येवून त्यांच्यामध्ये संक्रमण होवून नवीन (HlNl)विषाणू तयार झाला. या विषाणूंचा प्रार्दूभाव सर्व प्रथम एप्रिल 2009 मध्ये मेक्सिको येथे माणसांमध्ये दिसून आला. त्यानंतर माणसांमध्ये हा विषाणू दिसून आला. त्यानंतर माणसांमध्ये हा विषाणू वेगाने पसरत गेला व आज सर्व जगामध्ये याचा प्रार्दूभाव दिसून येत आहे. भारतामध्ये सर्वात जास्त प्रार्दुभाव महाराष्ट््रामध्ये जून 2009 पासून दिसून येत आहे. सोलापूरात ऑगस्ट 2009 पासून या आजाराचे रुग्ण सापडत आहे. | |
| | |
| 4) स्वाईन फ्लू (HlNl) या आजाराचा प्रसार कसा होतो. ? (HlNl) फ्लू हा प्रामुख्याने श्वसन संस्थेचा आजार असून याचा प्रसार सर्वसाधारणफ्लू सारखाच हवे मार्फत खोकताना, शिंकताना होवू शकतो. रोग्याचा निकट संपर्कात असता (6 फूटाच्या आत) विषाणू थेट समोरील व्यक्तीच्या नाका - तोंडाद्वारे शरीरात पोहचतात. तसेच खोकल्यावर, शिंकल्यावर हे विषाणू हवेमध्ये व इतरत्र वस्तूंवर काही काळ (1 ते 2 तास) जिवंत राहतात. व अशा दूषित वस्तू हाताळल्यावर हात दूषित होतात व या दूषित हाताचा संपर्क लगेचच नाक / डोळे / तोंडाशी झाला असता विषाणूंचा संसर्ग होवू शकतो. | |
| | |
| 5) डूकराचे मांस खाल्यास (HlNl) फ्लू चा संसर्ग होवू शकतो का? फ्लू च्या विषाणूचा प्रसार अन्नपदार्थाद्वारे होत नाही. तथापि जेवणापूर्वी हात स्वच्छ धूणे व मांस योग्य तापमानापर्यंत शिजवून खाणे सर्वोत्तम. | |
| | |
| 6) (HlNl) फ्लू चा आजार फक्त शहरी भागातच होते हे खरे आहे काय. ? (HlNl) फ्लू हा श्वसन संस्थेचा आजार हवेच्या माध्यमातून व रुग्णाच्या निकट संपर्काद्वारे पसरतो. शहरी भागात दाट लोकवस्ती असल्याने संसर्गाचे प्रमाण वेगाने होते. सर्वप्रथम रुग्ण जरी शहरी भागात आढळून आले तरी ग्रामीण भागातही याचा प्रार्दूभाव झाल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात लोकवस्ती विरळ असल्याने कदाचित मोठया प्रमाणात रुग्ण संख्या दिसून येणार नाही. तथापि शहरी भागाप्रमाणे रोगनिदान व उपचाराच्या संधी लगेचच उपलब्ध नसल्याने गंभीर स्वरुपाचा आजार होण्याचे प्रमाण ग्रामीण भगात जास्त असू शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी विशेष करुन आजाराविषयी काळजी घेणे जरुरीचे आहे. | |
| | |
| 7) (HlNl) फ्लू या आजाराची लक्षणे कोणती. ? विषाणूंचा (HlNl) संसर्ग झाल्यानंतर साधारणपणे 1 ते 7 दिवसापर्यंत आजाराची लक्षणे दिसून येण्यास प्रारंभ होतो. रुग्णामध्ये सर्वसाधारण फ्लू सारखीच लक्षणे दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने ताप येणे, कोरडा खोकला, सर्दी , घसा खवखवणे, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा जाणवणे इ. लक्षणे दिसून येतात. काही रुग्णामध्ये मळमळणे, उलटी, अतिसार अशाप्रकारची लक्षणेही आढळून येतात. वरिल लक्षणे दिसून येताच लगेचच (HlNl) फ्लू झाला आहे. अशी भीती बाळगू नये. तथापि अचूक निदान झालेल्या रुग्णाशी आपला निकट संपर्क झाला असल्यास लगेचच डॉक्टरांकडे जावून तपासणी करुन घ्यावी. | |
| | |
| 8) (HlNl) फ्लू चा आजार कोणाला होवू शकतो. ? (HlNl) फ्लू च्या रुग्णाशी निकटचा संपर्क असलेल्यांना या विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते. संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये कमी-जास्त प्रमाणात रोगाची लक्षणे दिसून येतात. प्रामुख्याने तरुण व मध्यम वयोगटात (15-45 वर्ष) आजाराचे प्रमाण जास्त दिसून येते. यापूर्वी (मागील वर्षे) संसर्ग झालेल्या व्यक्ती व ज्यांनी लसीकरण करुन घेतले आहे. अशा व्यक्तींमध्ये आजाराची लक्षणे दिसून येण्याचे प्रमाण अत्यल्प असते. बहुतांशी आजाराची लक्षणे सौम्य स्वरुपाची असतात. तथापि काही व्यक्ती मध्ये तीव्र स्वरुपाची लक्षणे दिसून येतात. | |
| | |
| 9) तीव्र गंभीर स्वरुपाचा आजार कोणामध्ये दिसून येतो. . ? खालील व्यक्तींमध्ये आजाराचे स्वरुप गंभीर असण्याची शक्यता असते. - 5 वर्षाखालील मुले व 65 वर्षावरील वयस्कर व्यक्ती.
- मधुमेह, उच्च रक्तदाब, लिव्हर, किडनी, ह्रदय यांचे आजार
- गरोदर माता, स्तनदा माता
- एचआयव्ही /एड्स, कॅन्सर, श्वसंस्थेचे आजार (दमा, टीबी)
- रोग प्रतिकारक शक्ती कमी झालेली व्यक्ती
वरील सर्व व्यक्तींनी लवकरात लवकर (लक्षणे दिसून येताच 48 तासांच्या आत) रोगनिदान व उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अन्यथा रुग्ण दगावण्याची शक्यता असते. रुग्ण दगावण्याची शक्यता दर 100 रुग्णांमध्ये 1 ते 5 पर्यंत असू शकते. | |
| | |
| 10) रुग्णांपासून किती दिवसांपर्यंत (HlNl) विषाणूंचा प्रसार होवू शकतो.? (HlNl) फ्लू च्या रुग्णाकडून आजाराची लक्षणे सुरु होण्याअगोदर 1 दिवस ते लक्षणे सुरु झाल्यापासून 7 दिवसांपर्यंत विषाणूंचा प्रसार होवू शकतो. लहान मुलांमध्ये जवळपास 14 दिवसांपर्यंत विषाणूंचा प्रसार होवू शकतो. | |
| | |
| 11) (HlNl) फ्लू च्या गंभीर स्वरुपातील आजाराची लक्षणे कोणती. ? (HlNl) फ्लू च्या रुग्णांमध्ये खालील प्रकारची लक्षणे दिसून आल्यास आजार गंभीर स्वरुपाचा आहे. असे समजावे व यामध्ये ताबडतोब उपचार होणे गरजेचे आहे. - जास्त ताप येणे
- श्वसनला त्रास होणे
- छाती व पोट दुखणे
- अचानक तोल जाणे / अंधारी येणे
- थकवा जाणवणे
- तीव्र व सतत होणारी उलटी / अतिसार
- लघवी थांबणे
- लहान मुलांमध्ये त्वचा निळसर होणे, भूक मंदावणे, तोल जाणे, किरकिर वाढणे, तापा बरोबर अंगावर पुरळ येणे. इ. लक्षणे गंभीर स्वरुपाची समजावी.
| |
| | |
| 12) आजाराची लक्षणे दिसू लागल्यावर रुग्णाने कोणती काळजी घ्यावी.? - सर्दी , खोकला अशी लक्षणे दिसल्यावर ती लक्षणे (HlNl) फ्लू चीच आहेत अशी भीती बाळगू नये - या काळात घरामध्ये इतरांपासून (कमीत कमी 7 दिवस) दूरच रहावे व विश्रांती घ्यावी. अशा मुलांना शाळेमध्ये पाठवू नये.
- सार्वजनिक गर्दीच्य ठिकाणी जाणे टाळावे.
- खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करावा.
- नाक व तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधावा.
- वापरलेला मास्क / रुमाल पुर्णपणे निर्जंतूक करावे.
- भरपूर पाणी प्यावे, संतुलित आहार घ्यावा.
- हात वारंवार साबण पाण्याने धुवावेत.
- रुग्णांच्या सानिध्यातील फरशी व इतर साहित्ये जंतुनाशक औषधाने पुसून घ्यावीत.
- धाप / दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे इ. लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्यावा.
| |
| | |
| 13) (HlNl) फ्लू च्या आजाराचे अचूक निदान कसे ठरविले जाते. ? (HlNl) फ्लू चे अचूक निदान करण्यासाठी संशयीत रुग्णाच्या नाक व घशातील स्त्रावाची तपासणी आवश्यक आहे. असे नमुने घेणे व त्याची तपासणी करणे या गोष्टी ठराविक ठिकाणीच उपलब्ध आहेत. तपासणीचा निष्कर्ष (अहवाल) 1 ते 2 दिवसात प्राप्त होवू शकतो. संबंधित तपासणाी कोणत्या ठिकाणी होवू शकते याबाबत आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी माहिती पुरविण्यात येते. | |
| | |
| 14) (HlNl) फ्लू च्या आजारावर उपचार होवू शकतो काय.? (HlNl) फ्लू च्या आजारावर योग्य उपचार उपलब्ध असून असे उपचार रुग्णाला ताबडतोब (लक्षणे दिसू लागल्याच्या 48 तासाच्या आत) सुरु करणे आवश्यक आहे. असे उपचार सरकारी दवाखाने / पालीका दवाखाने व काही विशिष्ट रुग्णालये येथेच केले जातात. काही रुग्णांमध्ये गंभीर स्वरुपाची लक्षणे दिसून येतात. अशा वेळी त्यांचे उपचार जिल्हा रुग्णालयात केले जातात. उपचारा दरम्यान रुग्णाबरोबर असलेल्या व्यक्तीने देखिल योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. | |
| | |
| 15) आजार होवू नये म्हणून बाजारात काही इतर औषधोपचार उपलब्ध असल्याचा दावा केला जातो यात काही तथ्य आहे काय.? रुग्णांच्या निकट संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना (उदा.डॉक्टर, नर्स, नातेवाईक इ.) आजारा पासून संरक्षण होण्यासाठी विशिष्ठ औषधोपचार दिले जातात. हे औषधोपचार शास्त्रीय आधारावर ठरविण्यात आलेले आहेत. तथापि या व्यतरिक्त इतर काही औषधोपचार उपलब्ध असल्याबाबत दावा काही व्यक्ती / संस्था करीत असतात. परंतु त्याबाबत काही शास्त्रीय आधार नसल्यास असे उपचार करणे टाळावे व डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार औषधोपचार करुन घ्यावेत. | |
| | |
| 16) (HlNl) फ्लू चा आजार टाळण्यासाठी उपचार उपलब्ध आहेत काय.? (HlNl) फ्लू चा आजार टाळण्यासाठी भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. त्यापैकी एक लस नाकाद्वारे (स्प्रे करुन) दिली जाते. व दुसरी लस इंजेक्शनद्वारे दिली जाते. लस घेतलेल्यांमध्ये 90 ते 95 % व्यक्तींना पुढील 1 वर्षापर्यंत आजार होण्याची शक्यता नसते. यामधील नाकाद्वारे दिली जाणारी लस 3 वर्षावरील व्यक्तींना देण्यात येते. परंतु ही लस गरोदर माता, स्तनदा माता, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना दिली जात नाही. ही लस दिली जात असताना कोणतीही दुखापत होत नाही. इंजेक्शनद्वारे दिली जाणारी लस 18 वर्षा वरील व्यक्तींना देण्यात येते. हे इंजेक्शन एकदाच घ्यावे लागते. तथापि इंजेक्शनद्वारे देण्यात येणारी लस अंडयाची ऍलर्जी असणाऱ्या व्यक्तींना देण्यात येत नाही. या दोन्ही लसीकरणा नंतर कोणतेही मोठे दुष्परिणाम झाल्याचे दिसून आलेले नाही असा लस बनविणाऱा कंपनींचा दावा आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानूसारच लसीकरण करुन घ्यावे. |
No comments:
Post a Comment