शरीरदोषांमुळे लैंगिक समस्या


 स्त्रियांच्या लैंगिक समस्या

बालविवाह

योनिमार्गावरचा पडदा

योनिमार्गाचा कोरडेपणा

शरीरसंबंध करताना वेदना

संप्रेरकसंस्थेचे आजार

पुरुष शरीरदोष

संप्रेरकसंस्थेचे आजार

अंडगोलांची अपुरी वाढ

शिश्न वाकडे असणे

शिश्नाची त्वचा मागे न जाणे

व्रण आणि जंतुदोष

औषधांचे दुष्परिणाम

यकृताचे आजार

व्यसने

वाढते वय

स्त्रियांच्या

 लैंगिक समस्या

स्त्रियांच्या लैंगिक समस्या

बालविवाह*

बालविवाहामुळे मुलींना अकाली शरीरसंबंधाला सामोरे जावे लागते. इजा होणे, अकाली गर्भधारणा, मैथुनाविषयी भीती, इ. दुष्परिणाम त्यामुळे होतात. लहान वय असल्याने कुटुंबात गौण स्थान निर्माण होते व ते बरीच वर्षे कायम राहते; स्त्री-पुरुष संबंधात यामुळे एक उच्च-नीचता तयार होते. बालविवाह हरप्रयत्नाने टाळले पाहिजेत

योनिमार्गावरचा पडदा

काही जोडप्यांना योनिमार्गावरच्या पडद्याची कल्पना नसते. पडदा न फाटल्याने शिश्नाचा योनिमार्गात प्रवेश होत नाही, शरीरसंबंध वरवरचा येतो. यामुळे आनंद मिळणे तर दूरच;गर्भ राहणेही शक्य नसते. योनिमार्गाच्या तपासणीत हे कळून येते. सर्वसाधारणपणे हा पडदा पहिल्या संबंधातच पूर्णपणे फाटतो. 1-2 दिवस त्यातून किंचित रक्तस्राव होतो पण तो थांबतो. हस्तमैथुनानेही हा पडदा फाटू शकतो.

योनिमार्गाचा कोरडेपणा

काही स्त्रियांना योनिमार्गात (कोरडेपणा) स्त्राव कमी असल्यामुळे शरीरसंबंधात अडचण व वेदना होते. शिश्न आतमध्ये नीट शिरू शकत नाही. ब-याच वेळा 'भीती' हेच याचे कारण असते. खोबरेल तेल लावून तात्पुरती ही समस्या सुटू शकते. मैथुनोत्सुक स्त्रीच्या योनिमार्गात आपोआप स्त्राव पाझरतात. त्यामुळे मैथुनाअगोदरच्या कामक्रीडेचे महत्त्व आहे. स्त्रावाचे प्रमाण स्त्रीबीज निर्माण होण्याच्या दिवसांत साहजिकच जास्त असते; त्यानंतर ते थोडे कमी कमी होत जाते. पाळी कायमची थांबल्यानंतर योनीमार्ग कोरडा होत जातो.

शरीरसंबंध करताना वेदना

योनिमार्गाचा जंतुदोष-दाह मूत्रमार्गाचा दाह किंवा ओटीपोटात काहीतरी जंतुदोष असणे,गर्भाशयाच्या तोंडाला सूज असणे किंवा योनिमार्गात जखमा हे वेदनेमागचे प्रमुख कारण असते. अशा स्त्रीची आतून तपासणी करताना याच प्रकारची वेदना होते. योग्य उपचाराने ही तक्रार दूर होऊ शकते.

संप्रेरकसंस्थेचे आजार

मधुमेह, गलग्रंथीचे आजार व इतर संप्रेरक ग्रंथीच्या बहुतेक आजारात स्त्रियांच्या कामेच्छा कमी होतात. योग्य तपासणीअंती दोष कळू शकतो.

जननसंस्थेतल्या गाठी /कर्करोग यामुळे मैथुनक्रियेत अडथळा येतो.

पुरुष शरीरदोष

संप्रेरकसंस्थेचे आजार

मधुमेह, गलग्रंथी व इतर संप्रेरकसंस्थांचे आजार एकूण लैंगिक इच्छा कमी करतात. मध्यम किंवा उतार वयात लैंगिक इच्छा अचानक कमी झाली तर मधुमेहासाठी तपासणी करून घ्यावी.

अंडगोलांची अपुरी वाढ

वृषण-अंडगोलांची वाढ कमी असल्यास पुरुषी लक्षणे कमी प्रमाणात दिसतात (दाढी-मिशा, काखेतले केस कमी असणे, आवाज बायकी असणे, स्तन थोडे मोठे असणे, इ.)

शिश्न वाकडे असणे

काही जंतुदोषांमुळे शिश्न वाकडे होते, अशाने शरीरसंबंधात अडचण निर्माण होते.

शिश्नाची त्वचा मागे न जाणे

साधारणपणे शिश्नाच्या कातडीचे छिद्र पुरेसे मोठे असल्यामुळे त्वचा मागे जाऊन शिश्नाचा बोंडाचा भाग उघडा होतो. शिश्न ताठरण्यासाठी हा भाग उघडा होणे उपयुक्त असते. संबंधानंतर त्वचा पूर्वीप्रमाणे पुढे आणता येते. (सुंता करताना ही त्वचा काढून टाकली जाते.) जर त्वचेचे पुढचे छिद्र लहान असेल तर त्वचा मागे जाऊ शकत नाही. क्वचित ही त्वचा मागे गेलीच तर ताठरलेल्या शिश्नावर आवळून अडकते. यामुळे खूप सूज येते. असे पुरुष शरीर संबंधाला साहजिकच धास्तावतात.

व्रण आणि जंतुदोष

लिंगसांसर्गिक किंवा इतर जंतुदोषांमुळे शिश्नावर व्रण, पू, सूज, गाठी, पुरळ असे विकार निर्माण होऊन लैंगिक क्रिया अवघड व वेदनादायक होते.

औषधांचे दुष्परिणाम

फीट (मिरगी), अतिरक्तदाब, मानसिक आजार यावरचे बहुतेक औषधोपचार यामुळे लैंगिक इच्छा मंदावते. सर्व रुग्णांना ही माहिती नीटपणे सांगितली पाहिजे.

यकृताचे आजार

यकृताचे कामकाज मंदावल्यामुळे (उदा. कावीळ) लैंगिक इच्छा कमी होते.











Comments

Popular posts from this blog

काविळ कशामुळे होते? काविळीचे प्रकार कोणते आणि त्याची लक्षणं कशी ओळखायची?

आंबट ढेकर, गॅस, छातीत जळजळीने वैतागलाय? पोटात वाढलंय भयंकर पित्त, हे 3 आयुर्वेदिक उपाय देतील एका मिनिटात मुक्ती

Exercises for shoulder problems