सुदृढ शरीरासाठी निरोगी, पौष्टिक व संतुलित आहार गरजेचा आहे. या टिप्स वाचून तुम्हाला संतुलित आहार कसा घ्यायचा याची कल्पना येईल.
- आहारातून कार्ब्स पूर्णपणे काढून टाकण्यापेक्षा चांगले कार्बोहायड्रेट निवडा. कार्ब्स आपल्याला ऊर्जेसाठी अत्यावश्यक आहेत. म्हणूनच रोजच्या आहार प्रक्रिया न केलेली धान्ये समाविष्ट करा.
- रोजच्या आहारात प्रथिने घेतलीच पाहिजे.डाळी, कडधान्ये, मासे, पोल्ट्री, नट्स आणि बीन्स हे प्रोटिन्सचे सर्वोत्तम पर्याय आहेत.
- हेल्दी फॅट्स असलेले पदार्थ निवडा, सॅच्युरेटेड फॅट जास्त असलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात खा आणि ट्रान्स फॅट असलेले पदार्थ टाळा. नट्स आणि मासे हे हेल्दी फॅट्सचे सर्वात आरोग्यदायी स्त्रोत आहेत.
- आहारात फायबरचा समावेश करा. तृणधान्ये, ताजी फळे व भाज्या असा भरपूर फायबरयुक्त आहार निवडा.
- भाज्या व फळांतून आपल्याला व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स देखील मिळतात. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश केलाच पाहिजे.
- शरीराचे कार्य सुरळीत चालावे व हाडे भक्कम राहावीत यासाठी कॅल्शियम महत्वाचे आहे. कॅल्शियम असलेले पदार्थ जसे की दूध, खारीक, नाचणी यांचा आहारात समावेश करा.
- तहान शमवण्यासाठी शीतपेये पिऊ नका. आपले साधे पाणीच आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम आहे.
FAQ – आरोग्यासंबंधी पडणारे काही सामान्य प्रश्न
निरोगी खाणे महत्वाचे का आहे?
उत्तम आरोग्य आणि शरीराला पोषण मिळण्यासाठी सकस आहार आवश्यक आहे. पौष्टिक अन्न हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या अनेक जुनाट असंसर्गजन्य आजारांपासून तुमचे संरक्षण करते.
पौष्टिक आहार म्हणजे काय?
पौष्टीक आहार म्हणजे विविध प्रकारचे अन्न खाणे ज्यातून तुम्हाला आरोग्य राखण्यासाठीआणि उर्जा मिळविण्यासाठी आवश्यक पोषक तत्वे मिळतात. या पोषकतत्त्वांमध्ये प्रथिने, कर्बोदके, चरबी, पाणी, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश होतो. प्रत्येकासाठीच पौष्टीक आहार आवश्यक आहे.
दूध पिणे आरोग्यासाठी चांगले आहे का?
दूध हे कॅल्शियम, फॉस्फरस, बी जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन डी सारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. दूध हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहारात समाविष्ट केल्याने ऑस्टिओपोरोसिस आणि हाडांचे फ्रॅक्चर टाळता येऊ शकते.
भात खाणे शरीरासाठी चांगले आहे का?
तांदूळ हा कर्बोदकांचा एक समृद्ध स्त्रोत आहे.. कर्बोदके तुम्हाला उत्साही आणि समाधानी ठेवू शकतात आणि व्यायामाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. विशेषतः हातसडीचा किंवा तपकिरी तांदूळ हा फायबर, मॅंगनीज, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि बी जीवनसत्त्वे यासह अनेक पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्रोत आहे.
निरोगी राहण्याचे 3 मार्ग कोणते आहेत?
नियमित व्यायाम, पौष्टिक आहार आणि चांगली झोप हे निरोगी राहण्याचे सोपे मार्ग आहेत.
No comments:
Post a Comment