- बिनाइन ट्यूमर म्हणजे कर्करोगाची गाठ. ही गाठ सहज काढून टाकता येते. अशा बिनाइन ट्यूमरच्या पेशी बाहेर पडून नव्या अवयवामध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करीत नाहीत. बहुतेक बिनाइन ट्यूमर प्राणघातक नाहीत.
- मारक गाठी (मॅलिग्नंट) कर्करोग. कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणाऱ्या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवामध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्यापेशी लसिका संस्थेमार्फत किंवा रक्तवाहिन्यामधून इतर अवयवांमध्ये प्रवेशतात. त्यामुळे मूळ ज्या अवयवामध्ये मारक गाठी झालेल्या असतात त्याहून वेगळ्या अवयवामध्ये कर्करोग पसरतो. या प्रकारास कर्कप्रक्षेप म्हणतात.
जेव्हा कर्करोग मूळ अवयवामधून दुसऱ्या अवयवामध्ये प्रक्षेपित होतो त्यावेळी दुसऱ्या अवयवामधील कर्करोग पेशी मूळ अवयवामधील कर्कपेशीप्रमाणेच असतात. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूमध्ये स्थालांतरित झाल्यास मेंदूमधील कर्कपेशी या फुफ्फुस कर्कपेशीच असतात. अशा आजारास प्रक्षेपित फुफ्फु्स-कर्करोग म्हणतात.
कर्करोगाचे ऊतीवरून केलेले प्रकार- शरीरातील उतीॅंवरून कर्करोगाचे तीन प्रकार केलेले आहेत.
- संयोजी ऊतीना होणारा कर्करोग उती अर्बुद किंवा सारकोमा. या प्रकारातील कर्करोग स्नायू, अस्थि आणि रक्तवाहिन्यामध्ये होतो.
- अपिस्तर उऊना होणारा कर्करोग ‘कार्सिनोमा’ अभिस्तर ऊती कर्करोग किंवा कर्क अर्बुद स्तने, बृहदांत्र,आणि फुफ्फुस अशा अवयवांमध्ये होतो.
- ल्युकेमिया आणि लिंफोमा हा अस्थिमज्जेमधील रक्तपेशीना होणारा कर्करोग आहे. कधी कधी तो लसिका ग्रंथीमध्ये आढळतो.
आयुष्याच्या कोणत्याही कालखंडामध्ये कर्करोग होऊ शकतो. काही प्रकारचे कर्करोग लहान मुलांमध्ये होतात. उदाहरणार्थ डोळ्याच्या दृष्टिपटलाच्या पेशींच्या कर्करोग. बहुतेक प्रकारचे ल्यूकेमिया- रक्ताचे कर्करोग लहानपणी होतात. स्तनांचा, प्रोस्टेट –पौरुष ग्रंथी, आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग प्रौढपणी होतो.
कर्करोगाचे मुख्य प्रकार
- कार्सिनोमा: त्वचेमधून किंवा इतर अंतर्गत अवयवांच्या आवरणातील ऊतींमधून उगम पावणाऱ्या कर्करोगाचे नाव.
- सार्कोमा: हाडे, कूर्चा, चरबी, स्नायू, रक्तवाहिन्या अथवा इतर आधारिक ऊतींमध्ये सुरू होणारा कर्करोग.
- ल्यूकेमिया: रक्त तयार करणाऱ्या ऊतींमध्ये (उदा. अस्थिमज्जा) उगम पावणारा कर्करोग. ह्यामुळे फार मोठ्या संख्येने असामान्य रक्तपेशी तयार होऊन त्या रक्तप्रवाहात मिसळतात.
- लिंफोमा आणि मायलोमा: शरीराच्या प्रतिकारयंत्रणेमध्ये उगम पावणारा कर्करोग.
- सेंट्रल नर्वस सिस्टिम कॅन्सर: मेंदू आणि पाठीच्या कण्यातील ऊतींना होणारा कर्करोग.
No comments:
Post a Comment