Sunday, October 20, 2024

प्रसूती

 म्हणतात. मेरुरज्जूच्या शेवटी असलेल्या पोकळीमध्ये वेदनाशामकांच्या क्षेपणाने मातेस वेदना होत नाहीत. भारतामध्ये हे तंत्र अजून सर्वत्र पोहोचलेले नाही. मातेस प्रसव क्रियेच्या वेळी होणाऱ्या असह्य वेदनेमुळे शेवटी प्रतिक्षेपी क्रियेमुळे पोटाचे आणि श्रोणिगुहेचे स्नायू मोठ्या प्रमाणात आकुंचन पावतात आणि अर्भक योनीबाहेर येते. दर दहापैकी नऊ प्रसवामध्ये बाळाचे डोके आधी बाहेर येते. काहीं प्रसवामध्ये अर्भकाचे हात, खांदा, ढुंगण आधी गर्भाशयातून बाहेर येते. अशी प्रसवक्रिया अवघड समजली जाते.

प्रसवाच्या तिस-या टप्प्यात उल्बावरण, अपरा आणि वार गर्भाशयाच्या तीव्र आकुंचन पावण्याने गर्भाशयाबाहेर येते. यानंतरसुद्धा गर्भाशय आकुंचन पावते. त्यामुळे अपरा गर्भाशय भित्तिकेपासून वेगळी होते. या प्रसंगी गर्भाशय भित्तिका आणि अपरेमधील रक्त पोकळ्या उघडतात आणि रक्तस्त्राव होतो. एका प्रसूतीच्या वेळी सु. 150-250 मिलि रक्तस्त्राव होतो.मूल जन्मल्यानंतर अपरा आणि वार गर्भाशयाबाहेर येण्यास सु. पाच मिनिटांचा वेळ लागतो.

प्रसवाच्या चवथ्या आणि अखेरच्या टप्प्यास प्रसवपश्च टप्पा म्हणतात. अपरा आणि वार बाहेर आल्यानंतर या टप्प्याचा कालावधि सु. एक ते चार तासांचा आहे. या काळात गर्भाशयातील अपरा गर्भाशयापासून सुटल्याने उघड्या झालेल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. रक्तस्त्राव थांबतो. प्रसूतिमध्ये घ्यावयाची काळजी प्रसूतिमध्ये माता आणि अर्भकाची अनेक प्रकारे काळजी आणि त्वरित निर्णय घ्यावे लागतात. मातेची सुरक्षितता, मातेचे आरोग्य, अर्भकाची सुरक्षितता, अर्भकाची जन्म घेण्यावेळीची स्थिति, प्रसूतिमधील टप्पा व माता आणि अर्भकाचा प्रतिसाद. बहुतेक रुग्णालयामध्ये प्रसूतिच्या वेळी माता आणि अर्भकाच्या हृदयाचे ठोके, मातेचा रक्तदाब व अर्भकाच्या टाळूवरील दाब पाहिला जातो. प्रसव वेदनारहित करण्याचा निर्णय आणि प्रसव काळात पिटोसिन (ऑक्सिटॉसिन) देण्याचा निर्णय योग्य वेळी मातेच्या क्षमते प्रमाणे घेतला जातो. सुलभ प्रसूतिसाठी योनिमुख आणि गुदद्वारामध्ये उभा छेद घेण्याने प्रसूति लवकर होते. ही जखम कालांतराने बरी होते.

शत्रक्रिया प्रसूति: योनिमार्गातील प्रसूति अवघड आणि अधिक वेळ खाणारी असल्यास माता आणि अर्भक या दोघांच्या जिवावर बेतू शकते. अशा वेळी पोटाचा छेद घेऊन गर्भाशयाची शस्त्रक्रिया करून मूल गर्भाशयाबाहेर काढण्याच्या प्रकारास शस्त्रक्रिया प्रसूति म्हणतात. योनिमार्गातील प्रसूतीमधील एक मोठा अडथळा म्हणजे कटिबंधाची हाडे. या हाडांच्या पोकळीमधून अर्भकाचे डोके गर्भाशयग्रीवेतून योनिमार्गामध्ये यावे लागते. प्रसूतिच्या वेळी कटिबंधाची हाडे रिलॅक्सिन नावाच्या संप्रेरकाने सैल होतात. सध्या मातेचे गर्भधारणेचे वय वाढलेले असल्याने कटिबंधाची हाडे कडक होतात. अशा वेळी मधूनच प्रसव वेदना थांबल्यास,मूल योनिमार्गामध्ये बराच काळ राहिल्यास किंवा नाळेचा अर्भकाच्या गळ्याभोवती वेढा पडल्यास अर्भकाच्या मेंदूस पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. अशा मुलाच्या मेंदूमध्ये दोष उत्पन्न होण्याची शक्यता असते. अशा वेळी शस्त्रक्रिया प्रसूति करण्याचा निर्णय वैद्यकीय अधिका-यावर सोडावा

No comments:

Post a Comment

मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी?

                                                         मान दुखत असल्यास झोप कशी घ्यावी? मानेचा त्रास तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकत नाह...